Monday, 12 January 2009

झटपट कटलेट

साहित्य:
१/२ किलो बटाटे ,उकडून साले काढावी
५ ते ६ ब्रेड स्लाइस ,
आले एकगाठ किसुन घेणे
५ ते ६ लसून पाकळ्या किसणे
२ घोटे कांदे बारीक़ चिरलेले
१ हिरवी मिर्ची बारीक़ चिरलेली
१/२ वाटी बारीक़ चिरलेली कोथिम्बिर
१/२ टी स्पून गरम मसाला पावडर
१ टी स्पून धने-जीरे पावडर
२ टी स्पून तिखट पूड
१ टी स्पून हळ्द्
आमचूर पूड /लिंबू
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
कृति:
बटाटे पानी न जाऊ देता उकडावे,अलगद कुस्करावे ,त्यावर हळ्द्,तिखट ,गरम मसाला,धने-जीरे पावडर ,
मीठ,आमचूर पावडर (नसल्यास लिंबू पिळावे),चिरलेली कोथिम्बिर,मिरचीचे तुकडे ,कापलेला बारीक़ कांदा
ब्रेड स्लाइस पाण्यात बुडवून लगेचच घट्ट पिळुन् हाताने कुस्करून घालणे ,आले,लसूण किसुन घालने ।
वरील सर्व मिश्रण हळुवार हाताने त्याचे लांब गोल चपट्या आकाराचे कटलेट बनवावे ,तेल सोडून कढईमधे तांबुस कलरवर तळावेत।
सौस बरोबर गरम गरम खायला द्यावेत .

भरली सिमला मिरची

साहित्य:
१/२ किलो मध्यम आकाराची सिमला मिरची
१/२ किलो उकडलेले बटाटे
कांदे मध्यम आकाराचे बारीक़ चिरलेले
१ टी स्पून बडीशोप जाडसर वाटलेली पावडर
१ टी स्पून गरम मसाला पावडर
१/२ टी स्पून आमचूर पावडर
१ टी स्पून धने पावडर
१ टी स्पून जीरे पावडर
२ टी स्पून लाल मिरची पावडर
चवीनुसार मीठ
तेल
कृति :
सिमला मिरची धुवून पुसून वरील देठाकडून सुरीने पोखरुन आतील बिया व मधली दांडी काढावी.
मिर्चिमधे आतील मिश्रण भरण्यासाठी प्रथम बटाटे उकडून थंड झाल्यावर अलगद हाताने वरचेवर
छोटे छोटे तुकडे राहतील असे कुस्करावे ,एक पातेल्यात साधारण १ टी स्पून तेल घालून गरम करायला ठेवावे ,
तेल गरम झाल्यावर एकदम बारीक़ कापलेला कांदा घालावा ,चांगला लाल झाल्यावर कुस्करलेले बटाटे
घालून हलक्या हाताने २ते ३ मिनिटे परतल्यावर त्यावर लाल मिर्ची पावडर ,आमचूर पावडर ,धने,जीरे,बडिशेप पावडर ,गरम मसाला ,मीठ घालून परतावे २ ते ३ मिनिटानी गैस बंद करावा .आता वरील मिश्रण थंड होऊं द्यावे ।
नंतर सिमला मिर्चीमधे हे मिश्रण आत दाबुन भरावे ,जेणेकरून ते बाहेर येणार नाही .नंतर पातेल्यात २ टी स्पून
तेल गरम करावे ,नंतर सर्व मिरच्या पातेल्यात नीट लावून २ ते ३ मिनिटे वर खाली कराव्यात .आता गैस मंद
करून पातेल्यावर झाकण ठेवून मिरच्या शिजवाव्यात .पाण्याचे झाकण ठेवू नये ,तसेच ह्या मिरच्या फार शिजवू नये .
टिप :
1 . बटाटे परतताना त्याचा भुगा होऊ देऊ नये .
2. बडिशेप पावडर जाडसर ठेवावी ,फार बारीक़ करू नये ।
3. हळ्द घालू नये .

Thursday, 8 January 2009

शेंगदाना चटणी

साहित्य:

१ वाटी भाजून बारीक़ जाडसर बारीक़ केलेले दाने

२ मिरच्या

१/२ वाटी घट्ट दही

कोथिम्बिर

चवीनुसार मीठ

कृति :

वरील सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरवर बारीक़ करा,चटणी तयार....................

इडली, डोसा,ब्रेड बरोबर सर्वे करा

पनीर बिर्यानी

साहित्य:

पाव किलो पनीर
वाटया तान्दुळ
१/२ वाटी तुप
६ लवंगा
४ वेलदोडे
३ ते ४ दालाचिनिच्या काड्या
१ मोठा वेलदोडा
२ तमाल पत्रे
८ ते १० काळी मिरी

वाटण्यासाठी:

१० लसून पाकळ्या,१ इंच आले,१ मोठा टमाटर ,१ मोठा कांदा ,पाव वाटी कोथिम्बिर
४ ते ५ पुदिन्याची पाने ,१ टी स्पून गरम मसाला,१ टी स्पून मिरची पूड ,हळ्द,पाव वाटी
ओले खोबरे असे सर्व साहित्य घेवून बारीक़ करावे ।

सजावटीसाठी

थोड़ा तळलेला कांदा व काजू बेदाने ।

कृति:

तान्दुळ धुवून अर्धा तास भिजत घालावा .पातेल्यात २ टी स्पून तुप तापवून त्यात सर्व गरम मसाला फोडणीला घालावा ,त्यावर तान्दुळ घालून नेहमीप्रमाने मोकळा भात शिजवून घ्यावा ।
एका कढईत थोड़े तेल तापवून वाटलेला मसाला खमंग परतावा .पनीरचे एक इंचाचे चौकोनी तुकडे करून ते त्यावर परतावे .जरुरीनुसार थोड़े पानी व मीठ घालून दाटसर रस्सा ठेवावा .नंतर नेहमीप्रमाने थर देऊन बिर्यानीला वाफ आणावी ।

तळलेला कांदा व काजू बेदाने ने सजवून सर्वे करा।

Wednesday, 7 January 2009

मक्याच्या कणसाची उसळ

साहित्य :

कोवळी मक्याची कणस

नारळाचा चव

हिरव्या मिरच्या

कोथिम्बिर

धने जीरे पावडर

२ ते ४ लसून पाकळ्या

मोहरी,हिंग,तेल

लिम्बू

कृति :

कणस रात्रि पाण्यात भिजत टाकावीत,सकाळी किसावित,तो किस प्रेशर कुकर मधे वाफवून घ्यावा.नंतर त्यात नारळाचा चव ,धने जीरे पावडर,हिरव्या मिरचीचा ठेचा ,कोथिम्बिर ,मीठ,हळ्द् आणि चाविपुरती साखर घालावी

जाड पातेल्यात तेल मोहरी ,हिंग घालावा .नंतर किस त्यात वाफवावा , उसळ मोकळी होते ।

डिशमधून भरल्यावर पुन्हा थोडेसे खोबरे ,कोथिम्बिर पेरून लिम्बू पिळुन गरम गरम खायला द्यावी ।