Saturday 1 November 2008

मोड़ आलेल्या मटकी /मोट ची उसळ

साहित्य:
मोड़ आलेली मटकी १ पाव
कांदा १
टोमाटो १
हिरवी मिरची ,आले,लसून,खोबरे पेस्ट २ चमच
किसलेला गाजर (आवडत असल्यास ) १
धने जीरे पूड १/२ चमच
गरम मसाला १/२ चमच
हळ्द
मीठ चवीनुसार
साखर /गुळ चिमुटभर
कृति:
मटकी गरम पाण्यात थोडी वाफवून घ्यावी (ज्यास्त नको ).
पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यंत परता ,मग त्यात हिरवी मिर्ची,आले ,लसून ,खोबरे पेस्ट घालून अजुन थोड़े परता ,आता त्यात बारीक़ चिरलेला टोमाटो ,धने जीरे पूड, हळ्द ,गरम मसाला ,साखर घालून टोमाटो शिजेपर्यंत परता .आता त्यात वाफविलेली मटकी, गाजराचा किस ,मीठ घाला व ५ ते १० मिनिटे (मटकी शिजेपर्यंत ) शिजवा।
आवडिप्रमाणे मोकळी ठेवा /रस्सा करा .

तिखट/खारे शंकरपाळे

साहित्य:
मैदा ३ वाटी
रवा १/२ वाटी
तिखट १ चमच
हळ्द १/२चमच
तिळ १ चमच
ओवा १ चमच
कसूरी मेथी (आवडत असल्यास ) १चमच
मीठ चवीनुसार
तळण्याकरिता तेल
कृति :
वरील साहित्य एकत्र करून त्यात तेलाचे १ चमच मोहन (गरम तेल ) घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या ,पानी घालून घट्टसर पीठ मळुन घ्या व ते १ ते १/२ तास बाजूला ठेवा .आता या पिठाचे सारखे गोळे ,करुन लाटून त्याचे शंकरपाळे करून घ्यावेत ( कापून घ्यावेत ),कढईमधे तेल गरम करून तयार शंकरपाळे तळुन घ्यावेत.

Tuesday 30 September 2008

मेथी पराठा

साहित्य: १/२ जुड़ी मेथी

२ वाटी कणीक

१ ते २ चमच आले,लसून ,हिरवी मिरची ,कोथिम्बिर पेस्ट

चिमुटभर हळ्द

चवीपुरते मीठ

१ चमच ओवा

१ चमच तिळ

कृति:

मेथी स्वच्छ धुवून घ्या व कोरडी करून घ्या ।आता मेथी मिक्सरमधून बारीक़ करून घ्या (शक्यतोवर पानी वापरू नका)।आता २ वाटी कणीक घ्या व त्यात हळ्द ,आले,लसून ,हिरवी मिरची ,कोथिम्बिर पेस्ट ,मीठ,ओवा,तिळ व एक चमच तेल घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्या ,आता यात बारीक़ केलेली मेथीची पेस्ट घाला(गरज असेल तर थोडे पाणी घाला),पोळ्याच्या कणीक पेक्षा घट्ट हवी ।आता तयार कणकेच्या गोळ्यच्या लाट्या करुन पराठे लाटुन घ्या (नेहमीच्या पोळीहुन जाड असावेत )।आता तयार पराठे तव्यावर तेल घालून खरपूस भाजून घ्या । गरम गरम पराठे लोनी /दही /लोणच बरोबर सर्वे करा

Saturday 27 September 2008

पालक पराठा

साहित्य:
१/२ जुड़ी पालक
वाटी कणीक
१ ते २ चमच आले,लसून ,हिरवी मिरची ,कोथिम्बिर पेस्ट
चिमुटभर हळ्द
चवीपुरते मीठ
१ चमच ओवा
१ चमच तिळ

कृति:

पालक स्वच्छ धुवून घ्या व कोरडी करून घ्या .आता पालक मिक्सरमधून बारीक़ करून घ्या (शक्यतोवर पानी वापरू नका).आता २ वाटी कणीक घ्या व त्यात हळ्द ,आले,लसून ,हिरवी मिरची ,कोथिम्बिर पेस्ट ,मीठ,ओवा,तिळ व एक चमच तेल घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्या ,आता यात बारीक़ केलेली पालकाची पेस्ट घाला(गरज असेल तर थोडे पाणी घाला),पोळ्याच्या कणीक पेक्षा घट्ट हवी .आता तयार कणकेच्या गोळ्यच्या लाट्या करुन पराठे लाटुन घेने (नेहमीच्या पोळीहुन जाड असावेत ).आता तयार पराठे तव्यावर तेल घालून खरपूस भाजून घ्या ।

गरम गरम पराठे लोनी /दही /लोणच बरोबर सर्वे करा ...

मटर मशरूम

साहित्य:
मशरूम २५० ग्राम्स
मटर १ वाटी
कांदा १ (बारीक़
आले लसून पेस्ट १ चमच
टोमाटो प्यूरी २ चमच (मोठे)
धने जीरे पावडर
गरम मसाला
आमचूर पावडर १/२ चमच
कोथिम्बिर
मीठ चवीनुसार
लाल तिखट १ चमच
कृति:
मशरूमचे मीडियम आकाराचे कप करून घ्या .कढईमधे तेल तापवून त्यात हिंग मोहरी घलुन कांदा परतून घ्या,कांदा लालसर झाल्यावर त्यात आले लसून पेस्ट ,हळ्द,धने जीरे पूड घालून परता (कढईला लागत असेल तर थोड़े पानी घालावे )तेल सुटायला लागल्यावर ,त्यात मशरूम ,मटर,लाल तिखट,आमचूर पावडर घालने ,व झाकून ५ मिनिटे शिजविने ,मग यात टोमाटो प्यूरी ,मीठ,गरम मसाला घालून अजुन एक ते दोन वाफ येईस्तोवर शिजविने . कोथिम्बिर घालून गरम गरम सर्वे करा .
मोकळी पहिजे असेल तर प्युरिऍवजी बरिक चिरलेला टोमाटो वापरू शकता ....
तसेच ग्रेवी ज्यास्त पाहिजे असेल तर आले लसून पेस्ट ,टोमाटो प्युरीचे प्रमाण ज्यास्त घ्यावे ...........

Friday 26 September 2008

गाजराचा हलवा

साहित्य:
गाजर १/२ किलो
दूध १/२ लिटर
मावा पाव किलो
साखर पाव किलो
वेलची पूड १ चमच
ड्राय फ्रुट्स(आवाडीप्रमाने ) २५ ग्राम्स
तूप २ चमच

कृति :
गाजर स्वच्छ धुवून घ्या व त्याचा किस काढुन घ्या .आता एक पातेल्यात तूप घालून गाजराचा किस परतून घ्या ,पूर्ण कोरडा होईस्तोवर परता आता यात मावा (मावा आधी थोड़ा परतून घेत्यास उत्तम )घाला व व्यवस्थित एकजीव करून घ्या .आता यात दूध, वेलची पूड व साखर घाला व मंद आचेवर शिजायला ठेवा .हलवा घट्ट व्हायला लागल्यावर गैस बंद करा व त्यात ड्राय फ्रुट्स (बारीक़ कप करून) घाला.
तयार हलवा बाउलमधे घालून फ्रीजमधे सेट करायला ठेवा .एक ते दोन तासात सेट झालेला गाजराचा हलवा तयार ....... सर्वे करताना वरुण थोड़े ड्राय फ्रुट्स घालून सर्वे करा ................

तिरंगी कोशिंबीर

साहित्य:
१ काकडी
१ मुळा
१ गाजर
२ चमच दाण्याचा कुट
१ चमच हिरवी मिरची पेस्ट
मीठ
कोथिम्बिर
फोडणीसाठी :
मोहरी
हिंग
कढीपत्ता(बारीक़ चिरलेला)
कृति:
काकडी, मुळा, गाजर स्वच्छ धुवून त्याचा किस काढुन घ्या व त्यातील पानी निथळुन घ्या .आता या किसामधे दाण्याचा कूट ,हिरवी मिर्ची पेस्ट घाला व व्यवस्थित एकजीव करा .छोट्या पातेल्यात तेल गरम करून त्यात हिंग मोहरी ,हळ्द , कढीपत्ता घालून फोडनी करा व ही फोडनी एकजीव केलेल्या मिश्रणात घालून मिक्स करा .खायला घ्यायच्या वेळी यात दही व मीठ घालून एकजीव करा वरुण बारीक़ चिरलेली कोथिम्बिर घालून सर्वे करा .
आवडत असल्यास यात कांदा ,टमाटरही वापरू शकतो .......

Thursday 25 September 2008

वेजीटेबल पुलाव

साहित्य:
वाटी तांदुळ
१/२ वाटी फरसबी (बारीक़ केलेली)
१/२ वाटी गाजर (बारीक़ चिरलेला )
१/२ वाटी मटारचे दाने
बटाटा (मध्यम आकाराचे तुकडे)
पनीरचे तुकडे
जीरे फोडणीसाठी
कृति:
सर्वप्रथम तांदुळ धुवून पानी निथळुन घ्यावे व त्याचा मोकळा भात शिजवून घ्यावा व हा भात ठण्ड करायला बाजूला ठेवावा .सर्वे भाज्या (पनीर सोडून) वाफवुन घ्या .आता कढईमधे तेल तापवून त्यात
जीरे घालून वाफविलेल्या भाज्या व पनीरचे तुकडे परतवून घ्या ,मीठ , चिमुटभर हळ्द घाला व एक वाफ येईस्तोवर शिजवा ,आता शिजवलेला भात घाला व वरुन लिंबाचा रस पिळुन घ्या , व्यवस्थित मिक्स करून,एक वाफ येईस्तोवर शिजवा .
दह्याच्या रायत्यासोबत सर्वे करा ..............

मिश्र डाळीचे वडे

साहित्य:
१ वाटी चना डाळ
पाव वाटी उड्द डाळ
पाव वाटी मुग डाळ
१/२ वाटी तुर डाळ
२ कांदे बारीक़ चिरलेले
1 छोटा चमच आले लसून पेस्ट
२ चमच हिरवी मिर्ची पेस्ट
१/२ चमच धने जीरे पूड
बारीक़ चिरलेली कोथिम्बिर
ओवा आवडीप्रमाणे
तिळ आवडीप्रमाणे
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
कृति:
डाळी प्रथम पाण्यात ३ ते ४ तास भिजत घालाव्यात , भिजल्यावर पानी व्यवस्थित निथळुन घ्यावे.आता मिक्सर मधून खरमरीत बारीक़ करा,पानी शक्यतोवर वापरू नका ,व पीठ खरमरीतच हवे ज्यास्त बारीक़ नको .आता तयार मिश्रणात बारीक़ चिरलेला कांदा ,आले लसून पेस्ट ,मिरची पेस्ट , धने जीरे पूड ,ओवा , तिळ,मीठ ,बारीक़ चिरलेली कोथिम्बिर ( आवडत असल्यास बारीक़ केलेला कढीपत्ता घालू शकता ) घालून
व्यवस्थित मिक्स करा .
कढईमधे तेल तापत ठेवा,तेल गरम झाल्यावर तयार मिश्रनाचे गोळे करुन त्याला चापट करुन वड्याचा आकार दया व हे वडे गरम तेलात छान खरपुस तळुन घ्या ।
दुपारच्या चहाबरोबर हे गरम गरम वडे मस्तच वाटतात ..............

मक्याच्या दाण्याची भेळ

साहित्य:
2 वाटी मक्याचे दाने
१ कांदा बारीक़ चिरलेला
१ टमाटर बारीक़ चिरलेला
१ लिंबाचा रस
१ बटाटा (उकळलेला)
१/२ वाटी किसलेला गाजर
मीठ
1 t sp चाट मसाला
कोथिबीर ,बारीक़ शेव सजावटीसाठी
कृति :
मक्याचे दाने थोड़े वाफवून घ्यावेत,नंतर यात बटाटा,बारीक़ चिरलेला कांदा,टमाटर,गाजर घाला व चांगले मिक्स करा ,नंतर यात लिंबाचा रस ,मीठ,चाट मसाला , घालून अजुन व्यवस्थित मिक्स करा ।
सर्वे करताना वरुन कोथिम्बिर व बारीक़ शेव ,गोड चटनी (आवडत असल्यास)घालून सर्वे करा।
आवडत असल्यास यात बारीक़ किसलेला कोबीही घालू शकतो .

Wednesday 24 September 2008

टमाटर पुदीना चटणी

साहित्य:
२ मोठे टमाटर(बारीक़ कापलेले )
२ कांदे (बारीक़ कापलेले )
३ चमच पुदिन्याची पाने
3 सुक्या लाल मिरच्या
1 चमच उड्द डाळ
१ चमच चना डाळ
1
चमच धने
१ चमच जीरे
कढीपत्ता फोडणीसाठी
मोहरी फोडणीसाठी
कृती:
कढईमधे तेल तापवून त्यात पाहिले जीरे ,धने ,उड्द डाळ ,चना डाळ ,सुक्या लाल मिरच्या घाला ,थोड़े लालसर झाल्यावर त्यात कांदा घालावा व शिजू दया . कांदा शिजल्यावर त्यात ,पुदिन्याची पाने ,टमाटर ,मीठ घालुन शिजु दया .आता गैस बंद करून हे मिश्रण ठण्ड होऊ दया .ठण्ड झाल्यावर हे मिश्रण मिक्सर ला बारीक़ करून घ्या ।
आत्ता कढईमधे तेल तापवून त्यात मोहरी ,हिंगाची फोडणी करा, त्यात कढीपत्ता घालून वरील बारीक़ केलेले मिश्रण घाला व थोड़ा वेळ शिजू दया व गैस बंद करा ।
टमाटर पुदीना चटणी तयार..........
ही चटणी इडली ,डोसा सोबत मस्त वाटते ,पोळीसोबत ,ब्रेडसोबताही खाऊ शकतो .............

Tuesday 16 September 2008

lemon rice

हा भाताचा प्रकार मी माझ्या साउथ इंडियन शेजारी कडून शिकले,पहिल्यांदा जेव्हा मी ह्या भाताची टेस्ट घेतली तेव्हा मला फारच आवडला व मी लगेचच तिला भाताची रेसिपी मागितली व घरी करून पाहिला ,टिपिकल साउथ इंडियन टेस्ट जरी आली नाही तरी सर्वाना फार आवडला .आता इथे रेसीपी लिहिताना मला ह्या भाताची आठवण झाली म्हणुन रेसिपी देत आहे .......................
साहित्य :
तांदुळ १ वाटी
गाजर ,फरसबी ,मटर (बारीक़ कापलेले ) १ वाटी
सुक्या लाल मिरच्या ३ ते ४
२ लिबांचा रस
उडद डाळ चमच (पाण्यात भिजत घातलेली ... १/२ तास )
चना डाळ २ चमच (पाण्यात भिजत घातलेली ... १/२ तास )
हळ्द
मीठ चवीपुरते
कृति :
प्रथम भात मोकळा शिजवून घ्यावा व ठण्ड करुन घ्यावा . कढईमधे तेल तापवून त्यात जीर ,हिंग ,कढीपत्ता घालून त्यात उड़द व चना डाळ,सुक्या लाल मिरच्या परतुं घ्या,आता त्यात कापलेल्या भाज्या घालून शिजू द्या ,भाज्या शिजल्यावर (खुप शिजायला नकोत )त्यात ,मीठ , हळ्द व लिबांचा रस घालावा व उकळी येऊ द्यावी ,उकळी आल्यावर त्यात भात घालावा व मिक्स करुन एक वाफ येऊ द्यावी।
गरम गरम लेमन राइस तैयार ..........तसा हा भात ठण्डही चांगला लागतो ...
दह्याच्या रायत्याबरोबर मस्त चव येते .......
टिप : लिबांचा रसाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी ज्यास्त करता येइल

Monday 15 September 2008

मिश्र डाळीचा ढोकळा


साहित्य:
चना डाळ १/२ वाटी
हिरवी मुंग डाळ पाव वाटी
उड्द डाळ पाव वाटी
तांदुळ 1/2 वाटी
हिरवी मिरची , आले पेस्ट २ चमच
साखर ,मीठ चवीपुरते
फोडणीसाठी मोहरी ,कढिपत्ता,हिरवी मिर्ची
कृति:
सर्वे डाळी व तांदुळ वेगवेगळे भिजत घाला ,नंतर मिक्सरवर बारीक़ करा व साधारण 4 ते 5 तास हे मिश्रण बाजूला ठेवा .आता ह्या मिश्रणात,हिरवी मिरची पेस्ट ,साखर ,मीठ , हळ्द घाला व चांगले ढवळुन घ्या ,आयत्या वेळेवर मिश्रणात खायचा सोडा घालावा (चिमुटभर ),आता हे मिश्रण कुकरमधे /ढोकळ्याच्या स्टण्ड्मधे वाफवून घ्या (साधारण १५ मिनिटे ,कुकर असल्यास शिटी लावू नये ) .वाफवून झाल्यावर त्यावर तेल ,मोहरी ,कढिपत्ता,हिरवी मिर्ची ची फोडनी करून घालावी व आवडत्या आकाराप्रमाने तुकडे करावेत .

पौष्टिक थालिपीठ

साहित्य:
किसलेला कोबी १/२ वाटी
किसलेला दुधी १/२ वाटी
किसलेले बीट पाव वाटी
किसलेले गाजर पाव वाटी
तांदुळाचे पीठ २ वाटी
भाजणीचे पीठ १ वाटी
हिरवी मिर्ची पेस्ट २ चमच
तीळ, ओवा १,१ चमच
कृति:
किसलेल्या सर्वे भाज्या एकत्र करा ,त्यात तांदुळाचे पीठ , भाजणीचे पीठ ,हिरवी मिरची ,कोथिम्बिर पेस्ट ,तीळ, ओवा ,थोडीशी हळ्द,मीठ चवीपुरते घालून पीठ भिजवून घ्या .तव्यावर तेल घालून त्यावर पीठ घालून थालीपीठ करा दोन्ही बाजुनी तेलावर खरपूस परतवून घ्या .गरम गरम थालीपीठ ,दह्याबरोबर /लोणच्याबरोबर सर्वे करा

पनीर भुर्जी

साहित्य:
पनीर २५० ग्राम
कांदा(बारीक़ चिरलेला) २
लिंबाचा रस २ चमच
हिरवी मिर्ची २
आले/२ इंच
लसून १ कळी
धने जीरे पूड १ /२ चमच
गरम मसाला १/२ चमच
कृति:
प्रथम पनीर कुस्करून घ्यावा .कढईमधे तेल गरम करुन त्यात हिंग मोहरीची घालून कांदा परतवून घ्यावा.कांदा परतल्यावर त्यात हिरवी मिर्ची (बारीक़ कापलेली /पेस्ट ),आले ,लसून(बारीक़ केलेले) घालून परता, आता त्यात ,हळद,तिखट (वाटल्यास)गरम मसाला,धने जीरे पूड घालून अजुन जरा परता ,शेवटी पनीर , मीठ ,लिंबाचा रस ,घालून एक वाफ येइपर्यंत शिजवा .कोथिम्बिर घालून गरम गरम फुलक्या सोबत सर्वे करा ।
(यात आवडत असल्यास कसूरी मेथी ही वापरू शकतो छान चव येते )

काकडीचे थालीपीठ

साहित्य :
काकडी २५० ग्राम (कोवळी नको ,पिकलेली /पिकायला आली असेल तर उत्तम )
तांदुळाचे पीठ २ वाटी
भाजणीचे पीठ १/२ वाटी
तीळ २ चमच
हिरवी मिर्ची पेस्ट २ चमच
ओवा २ चमच
कृति:
काकडी प्रथम धुवून किसुन घ्यावी ,त्यात तांदुळाचे पीठ , भाजणीचे पीठ , तीळ ,हिरवी मिर्ची पेस्ट,कोथिम्बिर ,ओवा,हळ्द, तिखट,चवीपुरते मीठ घालावे व पीठ भिजवावे , खुप सैल नको (साधरण थालीपीठ घालता येतील असे असावे ) .तव्यावर तेल घालून त्यावर थलिपीठचे पीठ पसरवून घ्या व दोन्ही बाजुनी खरपूस भाजून घ्या .गरम गरम थालीपीठ लोणचाबरोबर सर्वे करा
अशाचप्रकारे लवकिचेही (दुधी )थालीपीठ करता येतात .

tomato omlet

साहित्य:

2 वाटी बारीक़ चिरलेले टमाटर

२ वाटी बेसन

१ चमच हिरवी मिर्ची,आले , लसून पेस्ट

२ चमच ओवा

मीठ चवीपुरते

हळद

कोथिम्बिर

कृति :

वरील सर्वे साहित्य एकत्र करा व भज्याच्या पीठ सारखे पीठ भिजवा .आता तव्यावर तेल घालून त्यावर चमच्याने पीठ सोडा व पसरून घ्या ,दोन्ही बाजूने खरपूस परतवून घ्या व गरम गरम आमलेट सौसे /लोणचे बरोबर सर्वे करा .(वाटल्यास यात सोडा घालू शकतो ,तसेच धने जीरे पुड पण वापरू शकतो )

Saturday 13 September 2008

कच्छि दाबेली

साहित्य :
उकळलेले बटाटे ५०० ग्राम्स
कांदा २
भाजलेले चिंचेचा कोळ २ चमच
मीठ चवीनुसार
साखर चवीनुसार
दाबेली मसाला २ चमच
बटर 1 चमच
बारीक़ शेव
दाबेलिचे पाव ६

कृति :
बटाटे कुस्करून घ्यावेत ,आता तेल गरम करुन त्यात बटाटे,दाबेली मसाला व बटर घालून परतुन घ्यावे ,त्यात गरज पडल्यास थोड़े पानी घालून एकजीव करून घ्यावे व गैसवरुन उतरवावे .
त्यात शेंगदाने , मीठ ,साखर,चिंच,बारीक़ चिरलेला कांदा ,कोथिम्बिर घालून एकजीव करावे .आता दाबेलीच्या पावाचे दोन तुकडे करावे ,एका भागावर बटर लावून भाजी पसरावी व त्यावर शेव पसरा
दुसर्‍या भागावर टोमाटो सौस लावून पहिल्या भागावर दाबुन ठेवावा बाहेर आलेल्या भाजीवर शेव लावा ,अणि आता हे पाव बटर लावून परतुन घ्यावेत।

Tuesday 9 September 2008

पालक भजी

साहित्य:
पालक (बारीक़ चिरलेला ) १ वाटी
कांदा (बारीक़ चिरलेला ) १
बेसन 2 वाटी
हिरवी मिर्ची २
मीठ
ओवा १ चामच
कृति:
पालक धुवून बारीक़ चिरून घ्या ,तयार बेसन ,बारीक़ चिरलेला कांदा,हिरवी मिर्ची,मीठ ,ओवा,मिक्स करा थोड़े पानी घालून भज्याचे पीठ भिजवा,त्यात आयत्या वेळी सोडा घाला .
आता कढईमधे तेल तापवून त्यात लहान लहान भजी सोडा व दोन्ही बाजुनी छान खरपूस तळुन घ्या ।
बाहेर मस्त पाऊस पडत असताना गरम गरम पालक भजी एन्जॉय करा .......................................

सिमला मिरचीची भाजी

साहित्य:
सिमला मिर्ची ५
दाण्याचा कूट ३ चमच
कांदा १
हलद
लाल तिखट
आमचूर पावडर 1tsp
कृति :
सिमला मिर्ची धुवून चिरून घ्या ।
कढईमधे तेल तापवून त्यात कांदा परता ,कांदा परतल्यावर त्यात ,मिर्ची घाला व एक वाफ येऊ दया ,वाफ आल्यावर त्यात ,हलद तिखट,आमचूर पावडर,व दाण्याचा कूट घाला चवीपुरते मीठ,घालून अजुन एक वाफ येऊ दया व गैस बंद करा . (वाटल्यास थोड़ा गरम मसाला वापरू शकतो)
सोपी ,लवकर होणारी व मस्त चव असणारी भाजी तयार ..................

भरली वांगी

भरली वांगी
साहित्य
वांगी ५ ते ६
दाण्याचा कुट १/२ वाटी
आले लसुन पेस्ट २ चमच
खसखस,मिरे,कलमी,वेलदोडे, नारळ(अंदाजे) पेस्ट २ चमच

धने जिरे पुड २ चमच

गरम मसाला पावडर १ चमच

आमचूर पावडर २ चमच

टमाटर १

कांदा १

कृति:


वांगी धुवून कोरडी करा व चिरून घ्या (उभा आणि एक आडवा छेद द्या)
कढईमधे तेल गरम करुन त्यात कांदा परतवून घ्या,आता त्यात आले लसुन पेस्ट ,खसखस मीरे कलमि,वेलदोडे पेस्ट घालावी , तेल सुटु लागल्यावर ,त्यात बरिक चिरलेला टमाटर ,लाल तिखट्,ह्ळद,आमचूर पावडर, गरम मसाला ,धने जीरे पुड ,मीठ ,गुळ घालुन टमाटर गळेस्तोवर शिजवावे ,बाजुला ठेवुन ठण्ड होउ द्या ,त्यात दाण्याचा कूट मिक्स करा , हा मसाला वांगयांमधे भरा व बाजूला ठेवा ।
आता कढईमधे तेल गरम करा, हिंग ,मोहरीची फोडनी घाला ,त्यात शिल्लक राहिलेला मसाला परता,तेल सुटु लागल्यावर त्यात वांगी घाला व चांगली वाफ येऊ दया एक वाफ आल्यावर त्यात थोड़े पानी घाला (रस्सा जसा पाहिजे तसे ) अणि परत दोन तीन वाफ येइपर्यंत शिजवा .

Thursday 4 September 2008

मोड आलेल्या मुगाची भेळ

साहित्य:
१ वाटी मोड आलेले मुग
२ वाटी कुरमुरे
१/२ वाटी बरिक शेव
१ कांदा
१ टमाटर
१ बटाटा (उकळ्लेला)
२ tsp हिरवी चटणी
२ tsp गोड चटणी
१ tsp चाट मसाला
मीठ चविनुसार
कॄति
एका बाउलमधे प्रथम बटाट्याच्या फोडी घ्या,आता त्यात मोड आलेले मुग (मुग थोडे वाफवुन घ्या) बारीक चिरलेला कांदा,टमाटर,हिरवी चटणी,गोड चटणी घालावी व व्यवथित मिक्स करा ,आता कुरमुरे घाला(ओली वाटल्यास अजुन कुरमुरे घालावेत) व परत मिक्स करा.
वरुन बरिक शेव व कोथिम्बिर घाला. सर्व करताना वरुन अजुन थोडी बरिक शेव व मोड आलेले मुग घालुन सर्व करा.

Saturday 30 August 2008

पाव भाजी

साहित्य:
आलू २५० ग्राम्स
कोबी २०० ग्राम्स
फुलकोबी २०० ग्राम्स
गाजर १२५ ग्राम्स
सिमला मिरची ग्राम्स
टोमाटो ३ ते ४ (मोठे)
कांदा ४ ते ५
मिर्ची (हिरवी) ३ ते ४
गरम मसाला २ tsp
पाव भाजी मसाला ३ tsp
आले लसून पेस्ट २ tsp
हलद १/२ tsp
लाल तिखट १ tsp
मीठ चवीनुसार
कृति :
प्रथम आलू व सर्वे भाज्या (बारीक़ करा ) boil करा (seprate).आलू smash करा अणि त्यातच भाज्या एकजीव करा
आता pan मधे तेल तापवून घ्या त्यात जीरे /मोहरी घलुन बारीक़ चिरलेला कांदा परतवून घ्या ,कांदा झाल्यावर त्यात मिर्ची ,आले लसून पेस्ट ,लाल तिखट,हलद ,गरम मसाला ,मीठ,पावभाजी मसाला घाला व थोड़ा वेळ शिजू दया,आता यात एकजीव केलेल्या भाज्या घाला व बरोबर मिक्स करा (सर्वे भाज्या चांगल्या मिक्स झाल्या पाहिजे )थोड़ा वेळ शिजू देऊन गैस बंद करावा .वर्ण कोथिम्बिर घालावी।
पाव butter लावून तव्यावर fry करा व गरम गरम भाजी सोबत सर्वे करा।

Wednesday 27 August 2008

रगडा pattice

साहित्य:
pattice :
आलू 200grams
हिरवी मिर्ची ,आले ,लसून पेस्ट २ tsp
चाट मसाला १ tsp
धने जीरे पावडर १ tsp
ब्रेड ३ ते ४
मीठ चवीपुरते
ब्रेड क्रेम्स
तेल ३ ते ४ चमचे (छोटे)
रगडा:
हिरवे / पांढरे वाटाणे २५० ग्राम्स
टोमाटो १ ते २
कांदा १
आले लसून पेस्ट २ tsp
धने जीरे पावडर १ tsp
गरम मसाला १ tsp
लाल तिखट १ tsp
हलद १/२ tsp
आलू १
मीठ चवीपुरते
तेल २ चमचे
कृति:
pattice:
आलू boil करा ,नंतर smash करताना त्यात वरील दिल्लेल साहित्य घाला ,शेवटी ब्रेड घाला (ब्रेड पानी मधून घालून प्रेस करूँ घ्या )आता ह्या मिश्रनाचे सारख्या आकाराचे गोले करावेत व त्याला patttice चा आकार देऊन ,ब्रेड क्रेम्स मधे घोल्वुन तव्यावर shallow fri करावेत.
रगडा:
watane कुकर मधून शिजवून घ्यावेत (ज्यास्त नरम नकोत )
pan मधे तेल गरम करा ,त्यात हिंग ,मोहरी, कांदा घालावा (कांदा बारीक़ कापलेला वा पेस्ट चालेल )
तेल सुटायला लागल्यावर त्यात आले लसून पेस्ट ,लाल तिखट ,हलद ,गरम मसाला,धने जीरे पुड ,व चाविपुरती साखर घालावी ,गरज पडल्यास पानी घालून थोड़े शिजू द्यावे ,मग हयात टोमाटो बारीक़ कापलेला ,watane ,मीठ , आलू कुस्करून घालावा (रस्सा कमी वाटल्यास थोड़े पानी घालावे ) व शिजू द्यावे ।
सर्वे करताना प्लेट मधे रगडा ,pattice वर बारीक़ शेव, बारीक़ चिरलेला कांदा ,कोथिम्बिर घालून सर्वे करावे.
आवडत असेल तर हिरवी व गोड चटणी वापरावी छान चव येते .

पनीर मेथी मलाई

साहित्य :
पनीर २००ग्रम्स
पालक २५० ग्राम्स
काजू पेस्ट २ tsp
कसूरी मेथी २ tsp
लाल मिरची पावडर १ tsp
आले लसून पेस्ट १ tsp
धने ,जीरा पावडर १ tsp
गरम मसाला १ tsp
क्रीम १ tsp
मीठ चवीनुसार
कृति :
पालक धुवून मिक्सर मधे बारीक़ करा ।
पनीर मीडियम आकाराचे काप करा व थोड्या तेलावर shallo fry करा ।
pan मधे तेल तापवून त्यात जीर ,आले लसून पेस्ट घालून परता ,तेल सुटायला लागल्यावर ,हलद ,लाल मिरची पावडर,कसूरी मेथी व काजूची पेस्ट घाला ,गरज पडल्यास थोड़े पानी घालून शिजू दया ,नंतर यात पालकाची पेस्ट गरम मसाला ,मीठ व धने जीरे पावडर घालावी,एक उकाली आल्यावर त्यात पनीरचे काप घालावेत,वरुण फ्रेश क्रीम घालावी व ५ मिनिटे ठेवून गैस बंद करावा , कोथिम्बिरने सजवून सर्वे करा।

Tuesday 26 August 2008

मटर पनीर

साहित्य :
पनीर २००ग्रम्स
मटर २००ग्रम्स
लसून ५ ते ६
आले १/२ इंच
कसूरी मेथी 2tsp
हलद १/२tsp
लाल मिर्ची पावडर १/२ tsp
बड़ी विलाय्ची १
जीर २ tsp
धने २ tsp
कांदा १ मीडियम
गरम मसाला २ tsp
टोमाटो प्यूरी 100 ग्राम्स
मीठ चवीनुसार
कृति:
प्रथम pan मधे तेल घेवून त्यात कांदा परतवून घ्यावा (ब्राउन होईपर्यंत )मग त्यातच लसून अदरक,धने,जीरे,
खोबरे,बड़ी वेलची घालून परतवून घ्यावे ,त्यात कसूरी मेथी घालून हे मिश्रण मिक्सर मधे बारीक़ करावे
पनीरचे मीडियम आकाराचे तुकडे कापून घ्यावेत व थोड्या तेलावर परतवून बाजूला ठेवावेत .
आता पातेल्यात तेल गरम करायला ठेवावे ,तेल गरम झाल्यावर त्यात जीरे,वर तयार केलेली पेस्ट घालून चांगले परतावे ,मग त्यात हलद ,लाल मिर्ची पावडर,मीठ ,गरम मसाला,टोमाटो प्यूरी घालून मटर घालावेत व् चांगले उकाली येत पर्यंत शिजू द्यावे मग यात कापलेले पनीरचे तुकडे घालून ५ मिनिटे शिजू देऊन गैस बंद करावा ।
कोथिम्बिर व फ्रेश क्रिमने सजवून गरम गरम सर्वे करावे.
(gravy पाहिजे तशी पातळ वा घट करता येते )

नवरत्न कोरमा

साहित्य:
फ्रेंच बिन्स ५० ग्राम्स
गाजर ५० ग्राम्स
फुलकोबी ५० ग्राम्स
मशरूम ५० ग्राम्स
मटर ५० ग्राम्स
पनीर २ ते ४ तुकडे
आले लसून पेस्ट २ tsp
काजू पेस्ट २ चमचे
जीरा पावडर १/२ चमचा
धने पावडर १/२ चमचा
हलद १/२ tsp
लाल मिरची पावडर १/२ tsp
गरम मसाला १/२ tsp
टोमाटो प्यूरी १०० ग्राम्स
मीठ चवीपुरते
तेल ४ ते ५ tsp
कृति:
प्रथम भाज्या धुवून चिरून घ्याव्यात (भाज्यांचे खुप बारीक़ तुकडे नकोत।)
नंतर भाज्या ५ मिनिटे शिजवून घ्याव्यात व बाजूला ठेवून द्याव्यात।
पातेल्यात तेल घेवून त्यात जीर, आले लसून पेस्ट घालावी ,तेल सुटायला लागल्यावर त्यात हलद,लाल मिरची पावडर,गरम मसाला,धने जीर पावडर घालवे व चांगले शिजू द्यावे (गरज पडल्यास थोड़े पानी घालावे )
आता काजूची पेस्ट ,शिजविलेल्या भाज्या ,मीठ व टोमाटो प्यूरी घालावी,पनीरचे तुकडे कुस्करून घालावेत ।
भाजी चांगली शिजल्यावर गैस वरुण उतरवावी व कोथिम्बिरने सजवून गरम गरम सर्वे करावी।