Wednesday 7 January 2009

पौष्टिक खमंग आप्पे

साहित्य:
वाटी साफ केलेले मूग,मसूर ,मटकी, चवळी, उड़द हरभरे,डाळ
१ वाटी धने
पाव वाटी जीरे ।
धने जीरे सोडून बाकि सर्वे धान्ये धुवून वाळ्वावीत ,मग धने जीरे घालून त्याचे सरबरित पीठ लावून आणावे ।
कृति:
वरील पीठ २ वाटी ,१/२ वाटी पातळ पोहे ,१/२ नारळाचा चव ,१ आल्याचा तुकडा,७ मिरच्या वाटुन ,कोथिम्बिर ,१ वाटी दही व आवडीनुसार दही घालून ५ ते ६ तास भिजवून ठेवावे ।
करायच्या वेळेस पीठात गरम तेल घालून चांगले फेटावे.आप्प्याचा तवा तापल्यावर ,प्रथम प्रत्येक साच्यात तेल घालून अर्धा साचा भरेल असे पीठ घालावे व तव्यावर झाकण ठेवावे ।
प्रत्येक आप्पा उलट्वुन दुसऱ्या बाजूने तळावा।
आप्प्याबरोबर खोबरयाची चटनी किंवा टोमाटो सौस द्यावे ।
गरम वाफाळ्लेल्या चहाबरोबर खमंग आप्पे लज्जत आणतील।

No comments: