Thursday 8 January 2009

पनीर बिर्यानी

साहित्य:

पाव किलो पनीर
वाटया तान्दुळ
१/२ वाटी तुप
६ लवंगा
४ वेलदोडे
३ ते ४ दालाचिनिच्या काड्या
१ मोठा वेलदोडा
२ तमाल पत्रे
८ ते १० काळी मिरी

वाटण्यासाठी:

१० लसून पाकळ्या,१ इंच आले,१ मोठा टमाटर ,१ मोठा कांदा ,पाव वाटी कोथिम्बिर
४ ते ५ पुदिन्याची पाने ,१ टी स्पून गरम मसाला,१ टी स्पून मिरची पूड ,हळ्द,पाव वाटी
ओले खोबरे असे सर्व साहित्य घेवून बारीक़ करावे ।

सजावटीसाठी

थोड़ा तळलेला कांदा व काजू बेदाने ।

कृति:

तान्दुळ धुवून अर्धा तास भिजत घालावा .पातेल्यात २ टी स्पून तुप तापवून त्यात सर्व गरम मसाला फोडणीला घालावा ,त्यावर तान्दुळ घालून नेहमीप्रमाने मोकळा भात शिजवून घ्यावा ।
एका कढईत थोड़े तेल तापवून वाटलेला मसाला खमंग परतावा .पनीरचे एक इंचाचे चौकोनी तुकडे करून ते त्यावर परतावे .जरुरीनुसार थोड़े पानी व मीठ घालून दाटसर रस्सा ठेवावा .नंतर नेहमीप्रमाने थर देऊन बिर्यानीला वाफ आणावी ।

तळलेला कांदा व काजू बेदाने ने सजवून सर्वे करा।

No comments: