Monday 12 January 2009

भरली सिमला मिरची

साहित्य:
१/२ किलो मध्यम आकाराची सिमला मिरची
१/२ किलो उकडलेले बटाटे
कांदे मध्यम आकाराचे बारीक़ चिरलेले
१ टी स्पून बडीशोप जाडसर वाटलेली पावडर
१ टी स्पून गरम मसाला पावडर
१/२ टी स्पून आमचूर पावडर
१ टी स्पून धने पावडर
१ टी स्पून जीरे पावडर
२ टी स्पून लाल मिरची पावडर
चवीनुसार मीठ
तेल
कृति :
सिमला मिरची धुवून पुसून वरील देठाकडून सुरीने पोखरुन आतील बिया व मधली दांडी काढावी.
मिर्चिमधे आतील मिश्रण भरण्यासाठी प्रथम बटाटे उकडून थंड झाल्यावर अलगद हाताने वरचेवर
छोटे छोटे तुकडे राहतील असे कुस्करावे ,एक पातेल्यात साधारण १ टी स्पून तेल घालून गरम करायला ठेवावे ,
तेल गरम झाल्यावर एकदम बारीक़ कापलेला कांदा घालावा ,चांगला लाल झाल्यावर कुस्करलेले बटाटे
घालून हलक्या हाताने २ते ३ मिनिटे परतल्यावर त्यावर लाल मिर्ची पावडर ,आमचूर पावडर ,धने,जीरे,बडिशेप पावडर ,गरम मसाला ,मीठ घालून परतावे २ ते ३ मिनिटानी गैस बंद करावा .आता वरील मिश्रण थंड होऊं द्यावे ।
नंतर सिमला मिर्चीमधे हे मिश्रण आत दाबुन भरावे ,जेणेकरून ते बाहेर येणार नाही .नंतर पातेल्यात २ टी स्पून
तेल गरम करावे ,नंतर सर्व मिरच्या पातेल्यात नीट लावून २ ते ३ मिनिटे वर खाली कराव्यात .आता गैस मंद
करून पातेल्यावर झाकण ठेवून मिरच्या शिजवाव्यात .पाण्याचे झाकण ठेवू नये ,तसेच ह्या मिरच्या फार शिजवू नये .
टिप :
1 . बटाटे परतताना त्याचा भुगा होऊ देऊ नये .
2. बडिशेप पावडर जाडसर ठेवावी ,फार बारीक़ करू नये ।
3. हळ्द घालू नये .

No comments: