Monday 12 January 2009

झटपट कटलेट

साहित्य:
१/२ किलो बटाटे ,उकडून साले काढावी
५ ते ६ ब्रेड स्लाइस ,
आले एकगाठ किसुन घेणे
५ ते ६ लसून पाकळ्या किसणे
२ घोटे कांदे बारीक़ चिरलेले
१ हिरवी मिर्ची बारीक़ चिरलेली
१/२ वाटी बारीक़ चिरलेली कोथिम्बिर
१/२ टी स्पून गरम मसाला पावडर
१ टी स्पून धने-जीरे पावडर
२ टी स्पून तिखट पूड
१ टी स्पून हळ्द्
आमचूर पूड /लिंबू
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
कृति:
बटाटे पानी न जाऊ देता उकडावे,अलगद कुस्करावे ,त्यावर हळ्द्,तिखट ,गरम मसाला,धने-जीरे पावडर ,
मीठ,आमचूर पावडर (नसल्यास लिंबू पिळावे),चिरलेली कोथिम्बिर,मिरचीचे तुकडे ,कापलेला बारीक़ कांदा
ब्रेड स्लाइस पाण्यात बुडवून लगेचच घट्ट पिळुन् हाताने कुस्करून घालणे ,आले,लसूण किसुन घालने ।
वरील सर्व मिश्रण हळुवार हाताने त्याचे लांब गोल चपट्या आकाराचे कटलेट बनवावे ,तेल सोडून कढईमधे तांबुस कलरवर तळावेत।
सौस बरोबर गरम गरम खायला द्यावेत .

No comments: