Monday, 5 January 2009

दहीवडा चाट

दहीवड्यासाठी साहित्य:
वाटी उडीद डाऴ
१ लीटर दुधाचे दही

बटाटे
४ हिरव्या मिरची आले ,कोथिम्बिर पेस्ट

टी स्पून साखर

चवीपुरते मीठ

तेल

कृति:

उडदाची डाळ पाण्यात सात ते आठ तास भिजवावी,थोडीशी सैलसर बारीक़ करून घ्यावी .मीठ घालून चांगले फेसून कड़क तेलात लहान लहान वडे गुलाबी रंगावर तळावेत .पाण्यात टाकावेत ,एक घाना तळुन होईपर्यंत पाण्यात राहू द्यावेत ,नंतर ते वडे बाहेर काढुन दुसरे त्यात घालावेत .दह्यात मीठ , हिरव्या मिरची आले ,कोथिम्बिर पेस्ट घालून घुसळुन घ्यावे .त्यातील अर्धे दही फ्रिज मधे ठेवावे,उरलेल्या दहयामधे अर्धी वाटी पानी घालून घुसळुन घ्यावे व हे दही वडयावर घालावे .दोन तासानी मुरल्यावर बंद डब्यात घालून फ्रिज मधे ठेवावेत .बटाटे उकडून बारीक़ तुकडे करून त्याला थोडेसे मीठ लावून ठेवावे।

चाट पुरी साहित्य:

१ वाटी मैदा

तेल तळ्ण्यासाठी
चाट पुरी कृति:

मैद्यात १ टे स्पुन तेल घालून पुरीप्रमाणे तळून मळुन ठेवावा .१/२ तासाने पातळ मोठी पोळी लाटून त्याच्या लहान लहान पुर्‍या पडून गुलाबी रंगावर तळून घ्याव्यात।

चाट मसाला :

३ टी स्पून धने

२ टी स्पून जीरे

१ टे स्पुन लाल तिखट

१ टे स्पुन आम्चुर पावडर

१ टे स्पुन मिरी पावडर

१ टे स्पुन पादेलोण

१ टे स्पुन मीठ


धने व जीरे गरम करून बाकीचे साहित्य घालून बारीक़ पावडर करून घ्यावी .(बाजारात उपलब्ध असनारा चाट मसाला वापरला तरी चालेल।)


ख्जुराची चटनी साहित्य :
१/२ वाटी चिंचेचा कोळ
पाव वाटी गुळ
खजूर शिजवून केलेली पेस्ट पाव वाटी
१ टी स्पून धने जीरे पावडर ,लाल तिखट
१/२ टी स्पून मिरी पावडर,
चवीपुरते मीठ
वरील सर्वे साहित्य एकत्र करून त्याची चटनी तयार करावी ।
सर्व्ह करताना डीशमधे चार दहीवडे ठेवावेत ,त्यावर बटाट्याच्या फोडी पसरून आठ दहा पुर्‍या घालाव्यात व फ्रिज मधे ठेवलेले दही घालावे .वरती गरम मसाला व खजूर चटनी ,कोथिम्बिर घालून द्यावे .

No comments: