Saturday 13 September 2008

कच्छि दाबेली

साहित्य :
उकळलेले बटाटे ५०० ग्राम्स
कांदा २
भाजलेले चिंचेचा कोळ २ चमच
मीठ चवीनुसार
साखर चवीनुसार
दाबेली मसाला २ चमच
बटर 1 चमच
बारीक़ शेव
दाबेलिचे पाव ६

कृति :
बटाटे कुस्करून घ्यावेत ,आता तेल गरम करुन त्यात बटाटे,दाबेली मसाला व बटर घालून परतुन घ्यावे ,त्यात गरज पडल्यास थोड़े पानी घालून एकजीव करून घ्यावे व गैसवरुन उतरवावे .
त्यात शेंगदाने , मीठ ,साखर,चिंच,बारीक़ चिरलेला कांदा ,कोथिम्बिर घालून एकजीव करावे .आता दाबेलीच्या पावाचे दोन तुकडे करावे ,एका भागावर बटर लावून भाजी पसरावी व त्यावर शेव पसरा
दुसर्‍या भागावर टोमाटो सौस लावून पहिल्या भागावर दाबुन ठेवावा बाहेर आलेल्या भाजीवर शेव लावा ,अणि आता हे पाव बटर लावून परतुन घ्यावेत।

1 comment:

HAREKRISHNAJI said...

यात मसालेदार शेंगदाणे आणि डाळींबाचे दाणॆ टाकल्यावर त्याची लज्जत आणाखीनच वा्ढ्ते